About Us

Story Behind The Taste Of 'Bullet Chaha'.

कहाणी ‘बुलेट चहा’ ची…

‘बुलेट चहा हा पुण्यातील एक अधिमूल्य चहा चा ब्रँड आहे. याची सुरुवात पुण्यातील बिबवेवाडी येथून झाली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करण्यास सज्ज आहे!

बुलेट चहा ची स्थापना श्री. गजानन सरकाळे आणि श्री. श्रीकांत भोसले या तरुण उद्योजकांनी एकत्रित येऊन केली. श्री. गजानन सरकाळे यांना लोक प्रेमाने ‘गजाभाऊ’ असे संबोधतात. गजाभाऊंना ट्रेकिंग आणि साहसी खेळांची प्रचंड आवड!

आपण आपल्या मित्रमंडळींसोबत असतो तेव्हा हमखास “चला चहा घेऊ” असे म्हणतोच. आज आपल्या आजूबाजूला विविध प्रकाचे चहा असंख्य स्टॉल्स आणि दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. परंतु ‘बुलेट चहा ‘ ला ‘स्पेशल’ आणि इतरांपेक्षा वेगळं ठरवते ती त्यामागची रंजक कहाणी!

गजाभाऊंना विविध ठिकाणी फिरण्याची प्रचंड हौस! काश्मीर पासून कन्याकुमारी आणि कच्छ पासून कलकत्यापर्यंत सर्व प्रदेशांचा भाऊंनी आपल्या आवडत्या ‘रॉयल एन्फिल्ड बुलेट 500’ या गाडीवर प्रवास केला.

या संपूर्ण भारत भ्रमंतीमध्ये गजाभाऊंनी संपूर्ण भारतातले विविध प्रकारचे चहा पिऊन पहिले होते. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि भारतासारख्या विविधतेने नटलेल्या नानाविध संस्कृत्या असलेल्या या देशाला जोडणारा एक सामायिक धागा आहे आणि तो म्हणजे चहा!

जसे मराठीत आपण “बारा गावचा पाणी पिलेला माणूस “ म्हणतो तसेच गजाभाऊ हा खऱ्या अर्थाने “बारा गावचा चहा पिलेला माणूस आहे” आणि यातूनच उदयाला आली चहाच्या व्यवसायाची कल्पना!

‘गजाभाऊचा बुलेट चहा’ हे नाव या व्यवसायासाठी योग्य राहील हे सर्वांच्या विचाराअंती ठरले! मग काय पुण्यातील बिबवेवाडी येथे दणक्यात शुभारंभ झाला आणि बघता बघता दुकानाचा परिसर गर्दीने फुलून गेला! अल्पावधीतच सर्व लोक बुलेट चहा च्या प्रेमात पडले आणि एका उत्तम व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम शासक तसेच एक उत्तम उद्योजक आणि व्यवस्थापक सुद्धा होते आणि गजानन भाऊंनी महाराजांचा आदर्श घेत दूरदृष्टी ने विचार करण्यास सुरुवात केली.

व्यवसाय सुरु केला परंतु स्वतः पुरता विचार करून भागणार नाही हि गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि या व्यवसायात इतर तरुण मराठी उद्योजकांना उतरविण्याचा निर्धार त्यांनी केला.

त्यातूनच इतर तरुणांना या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन आणि मदत करण्यास सुरुवात केली आणि स्वतःचे फ्रँचायजी मॉडेल तयार केले. आज महाराष्ट्र भरातून तरुण या व्यवसायासाठी त्यांच्याकडे मार्गदर्शन आणि फ्रँचाइजी घेण्यासाठी येत आहेत.

Our Team

SHRI. GAJANAN SARKALE

SHRI. GAJANAN SARKALE

Founder

SHRI. SHRIKANT BHOSALE

SHRI. SHRIKANT BHOSALE

Co-Founder

SHRI. SAGAR SURVE

SHRI. SAGAR SURVE

Manager

SHRI. PRAMOD KUMBHARKAR

SHRI. PRAMOD KUMBHARKAR

Manager

SHRI. SURAJ SURVE

SHRI. SURAJ SURVE

Manager

Our Enthusiastic Staff

Now We Are Present At

Bibwewadi

(Pune)

Kasarwadi

(PCMC)

Narhe

(Pune)

Thergaon

(PCMC)

Kharadi

(Pune)

Wakad

(PCMC)

Shikrapur

(Pune)

Navi Sangavi

(PCMC)

Chakan

(Pune)

Our Gallery

Witness ‘Bullet Chaha Moments‘ In Media Room.

previous arrow
next arrow
previous arrownext arrow
Slider

या चहा घ्यायला!

We Are Open Daily!

06 AM -11 PM

MAIN BRANCH

Phone

+(91) 9623877877

Mail

bulletchaha@gmail.com

Address

B-404, Opp. Chintamani Nagar, Near SBI, Bibwewadi, Pune – 37 (Maharashtra, India)

WhatsApp chat